त्या ट्रँक्टरच्या हुलकणीतील अपघातातील महीलेचा उपचारा दरम्यान मृत्यू 

"पाचोड जवळलील हाँटेल निसर्ग समोर घडली होती घटना"

पाचोड(विजय चिडे)धूळे-सोलापूर महामार्गावरील पाचोड येथील हाँटेल निसर्ग समोर (दि.२७जून)रोजी एका ट्रक्टरने दुचाकीला हुलकणी दिल्याने दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले होते. यातील मैनाबाई शिवाजी मगरे(वय४५) रा.कोळीबोडखा ता.पैठण यांचा एक महीन्यानंतर (दि.२७)जुलैला उपचारादरम्यान औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात मृत्यू झाला आहे

याविषयी अधिक माहिती अशी की,पैठण तालुक्यातिल कोळीबोडखा येथील शिवाजी मगरे व त्यांच्या पत्नी मैनाबाई मगरे हे दोघे दि.२७ जुन रोजी पाचोड येथून आपले खाजगी काम आटोपून त्यांच्या दुचाकी क्रमांक (एम.एच.२०.एफए.३६७७) वरून गावाकडं जात असताना धूळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हाँटेल निसर्गसमोर जात असताना एका ट्रँक्टरने त्यांच्या दुचाकीला हुलकणी दिल्याने शिवाजी मगरे व मैनाबाई मगरे हे दोघेजण दुचाकीवरुन पडल्याने या अपघातात मैनाबाई शिवाजी मगरे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्या गंभीर जखमी होत्या.हा अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी जखमी ताबडतोब पाचोड येथील एका रूग्नालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र मैनाबाई मगरे यांची प्रकृती चिंताजणक असल्याने त्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना तात्काळ 

औरंगाबाद येथील खाजगी रुग्नालयात दाखल केले होते.परंतु बुधवार रात्री त्यांची एक महीन्यानंतर त्यांची अखेर प्राणज्योत माळवली आहे.घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आलेली असुन पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार गव्हाणे सह पोलिस नाईक पवन चव्हाण हे करीत आहेत.