ह.भ.प.कै. भाऊसाहेब गोविंदराव सातव विकास प्रतिष्ठानच्या वतीने अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दत्तक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप ,गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षक गुणगौरव सोहळा संपन्न झाला, विष्णूजी शेकूजी सातव विद्यालय वाघोली या ठिकाणी अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ह. प. कै. भाऊसाहेब सातव विकास प्रतिष्ठानच्या वतीने गरीब व गरजू चाळीस विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. दहावी व बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल विद्यालयाचे प्राचार्य अजिनाथ ओगले उपशिक्षिका रेश्मा वाघ कनिष्ठ व्याख्याते गणेश बुनगे प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सविता औटी आणि आदर्श सेवक शामकांत मोरे यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूर हवेलीचे आमदार अॅड अशोक बापू पवार होते. या कार्यक्रमासाठी दिलीप वाल्लेकर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हवेली, रामदास दाभाडे मा. जि. प. सदस्य सौ.वसुंधरा उबाळे माजी सभापती पंचायत समिती हवेली, बाळासाहेब सातव माजी शिक्षणाधिकारी पिंपरी चिंचवड मनपा, नानासाहेब आबनावे सामाजिक कार्यकर्ते, संदीप थोरात उपप्राचार्या तारा पवार उपमुख्याध्यापिका संगीता गायकवाड, पर्यवेक्षक उद्धव गोडसे, बिभिशन पवार ,उषा जठार, जेष्ठ नागरी संघाचे कार्यकर्ते महिला अनघा महिला मंडळाच्या अध्यक्षा संगीता बाळासाहेब सातव, गणेश बाळासाहेब सातव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरवण्यात आले. क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. त्यात अभिजीत कटके महाराष्ट्र केसरी, सुरज सातव नॅशनल चॅम्पियन सुवर्णपदक विजेता, आरती विलास दोरगे विधि क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी. प्राध्यापक डॉक्टर सदानंद सरदेशमुख अध्यक्ष भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट वाघोली यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी बोलताना आमदार अशोक पवार यांनी हरिभक्त परायण कै. गोविंदराव सातव प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब सातव हे करत असलेल्या कामाचे कौतुक करून दहावीच्या विद्यार्थ्यांशी हितगुज केली. स्पर्धा परीक्षा,व करिअर याबाबत मार्गदर्शन केले यावेळी आमदारांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा वाघ व अतुल बनकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार श्री बाळासाहेब सातव यांनी मानले.