सेलू शहरातील १० वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिच्या मावसभावास दुचाकीवरून जबरदस्तीने पळवून नेत मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेतील दोन आरोपीचे प्रकरण जलदगती न्यायायलयात चालवून त्यांना फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा भावना अनिलराव नखाते यांचेसह महिला पदाधिकारी यांना बुधवार ७ सप्टेंबर पाथरी तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री यांना सादर केले आहे.

            सेलू शहरात खाणीचा मारोती परीसरातील रस्त्यावरून अल्पवयीन मुलगी व पिडीत मुलीचा मावसभाऊ मुलगा यास जबरदस्तीने पळवून नेले. कोक शिवारात या नराधमांनी या मुलीवर अत्याचार केला. हि घटना मानवजातीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपीस न्यायालयाने जामीन मंजूर करू नये. याशिवाय न्यायायलयीन कोठडीत ठेऊन हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे या निवेदनात म्हटले आहे. 

           या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा भावना अनिलराव नखाते, रेखा मनेरे, मालन घाटूळ, नंदाताई वाळके, अनिता दूधमोगरे, संगीता हरकळ, आयोध्या मोगल, राधा जाधव, मंगल सुरवसे, मीरा वानखेडे या महिला पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.