सेलू शहरातील एका अल्पवयीन मुलीवर अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची सजा देण्यात यावी. समाजात असणाऱ्या विकृत आणि निच प्रवृतीच्या लोकांमुळे मुलींचे जिवन उध्वस्त होत आहेत. अशीच घटना सेलू शहरात घडली आहे. हे शहर मराठवाड्यातील शिक्षणाचे माहेर म्हणून ओळखले जाते. अशा शहरामध्ये भर दिवसा एका चिमुकल्या, कोवळ्या जीवावर अत्याचार झाला आहे. विकृत मानसिकता असलेल्या दोन व्यक्तींनी वासनेच्या आहरी जावून एका चिमुकल्या जिवाचा तिच्या बालपणाचा एक प्रकारे जीव च घेतलाय. या घटनेचा जेवढा निषेध केला तितका कमीच आहे. आणि ज्यांनी हे कृत्य केलंय त्यांना फाशीची सजा झालीच पाहिजे. जेणेकरून पुन्हा अशा घटना घडणार नाही. त्याचबरोबर असे कृत्य करणाऱ्याला आळा बसेल. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून प्रशासनाने सदर आरोप पत्र फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल करून आरोपींना फाशीची सजा तात्काळ देण्यात यावी अशी मागणी करण्यात यावी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवा नेत्या व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष प्रेक्षा भांबळे, रा. काँ.पा. तालुका अध्यक्षा मनीषा केंद्रे, जि.प. माजी सभापती रामराव उबाळे, तसेच माजी नगरसेविका आशाताई उबाळे, आशाताई खिल्लारे आदींच्या सह्या आहेत.