थेट सरपंचपदासह, ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा, आचारसंहिता लागू

"राज्यातील १८ जिल्ह्यांतील ११६६ ग्रामपंचायतींच्या होणार निवडणुका"

औरंगाबाद/राज्यातील विविध १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६६ ग्रामपंचाय तींच्या सदस्यपदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून, १४ ऑक्टोबर २०२२ रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. शिवसेनेतील फुटीनंतर आणि राज्यातील सत्तांतरानंतर होत असलेल्या या निवडणुकांकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकांमध्ये कोणाचे पारडे जड ठरणार, हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

राज्य सरकारने सरपंच निवडीबाबत काही दिवसांपूर्वी मोठा निर्णय घेतला होता. सरपंचाची निवडणूक ही थेट जनतेतून होणार आहे. त्यामुळे राज्यातील १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून, १४ ऑक्टोबर २०२२ रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणादेखील राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली आहे.

कुठे किती जागांसाठी होणार निवडणुका?

ठाणे – कल्याण- ७, अंबरनाथ- १, ठाणे- ५, भिवंडी- ३१, मुरबाड- ३५, शहापूर- ७९.

पालघर: डहाणू- ६२, विक्रमगड- ३६, जवाहार- ४७, वसई- ११, मोखाडा- २२, पालघर- ८३, तलासरी- ११, वाडा- ७०. रायगड अलिबाग- ३, कर्जत- २, खालापूर- ४, पनवेल- १, पेण- १, पोलादपूर- ४, महाड- १, माणगाव- ३, श्रीवर्धन- १. रत्नागिरी : मंडणगड- २, दापोली- ४, खेड- ७, चिपळूण- १, गुहागर- ५, संगमेश्वर- ३ रत्नागिरी- ४, लांजा- १५, राजापूर- १०

सिंधुदुर्ग – दोडामार्ग- २, देवडगड- २, नाशिक – इगतपुरी- ५, सुरगाणा- ६१, त्र्यंबकेश्वर- ५७ , पेठ- ७१, नंदुरबार – अक्कलकुवा- ४५, अक्राणी- २५, तळोदा- ५५, नवापूर- ८१, पुणे – मुळशी- १, मावळ- १

सातारा – जावळी- ५, पाटण- ५, महाबळेश्वर- ६, कोल्हापूर – भुदरगड- १, राधानगरी- १, आजरा-१, चंदगड – १, अमरावती – चिखलदरा- १, वाशीम- १, नागपूर – रामटेक ३, भिवापूर ६, कुही – ८. वर्धा २, आर्वी- ७

चंद्रपूर – भद्रवाती- २, चिमूर- ४, मूल- ३, जिवती- २९, कोरपणा- २५, राजुरा- ३०, ब्रह्मपुरी- १, भंडारा – तुमसर- १, भंडारा- १६, पवणी २ , साकोली- १, गोंदिया – देवरी-१, गोरेगाव- १, गोंदिया- १, सडक अर्जुनी- १, अर्जुनी मोर- २

असा आहे निवडणूक कार्यक्रम...

संबंधित तालुक्यातील तहसीलदार १३ सप्टेंबर २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज २१ ते २७ सप्टेंबर दरम्यान दाखल करता येतील. मात्र, २४ आणि २५ सप्टेंबर २०२२ रोजी शनिवार-रविवारची सुट्टी असल्याने या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. दाखल झालेल्या अर्जांची छाननी २८ सप्टेंबर २०२२ रोजी पार पडणार आहे. तर, ३० सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. ग्रामपंचायती निवडणुकीचे मतदान १३ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत पार पडणार आहे. मतमोजणी दुसर्‍याच दिवशी १४ ऑक्टोबर २०२२ रोजी होणार आहे. राज्यात झालेल्या मोठ्या राजकीय घडामोडींनंतर या निवडणुका होणार असल्याने सगळेच राजकीय पक्ष जोर लावणार आहे. त्यामुळे या निवडणुका मोठ्या रंगतदार होणार असल्याचा अंदाज आहे.