बोरी/ प्रतिनिधी:-

सेलू येथील एका दहावर्षीय बालिकेवर दोन दुचाकीस्वारानी बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोक शिवारात अत्याचार केल्याची घटना सोमवारी (दि.5) दुपारी घडली.

या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध सेलु पोलीस ठाण्यामध्ये सहा सप्टेंबर रोजी सकाळी साडेतीन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी 5 सप्टेंबरला संध्याकाळी दाखल होत अप्पर पोलीस अधीक्षक मुमक्कम सुदर्शन, उपविभागीय पोलिस अधिकारी अविनाश कुमार यांनी रात्रभर बोरी हद्दीमध्ये तपास करून या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले. सहा सप्टेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी दुपारी चार वाजता बोरी पोलिस ठाण्यास भेट देऊन बोरी बाजारपेठ तसेच येथील विविध ठिकाणी सीसी टीव्ही फुटेज तपासण्याचे काम रात्री सात वाजेपर्यंत सुरू होते.

 आरोपीचा शोध मोहीम सुरूच आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत मुळे यांनी दिली.