शिवाजी महाविद्यालयात आदर्श शिक्षकांचा सत्कार उदगीर नकारात्मकता हे जीवनातले विष असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी नकारात्मक विचार भावना व विचारांचे तन फेकून द्यावे व सकारात्मकतेचे बीज पेरावे जेवणात संगती ही असतात व संधीही असते परंतु नकारात्मक माणसाला ही संधी दिसत नाही सकारात्मक मानवच त्या संधीचे सोने करू शकतो व यशस्वी होतो असे मत डॉक्टर हनुमंत भोपाळे यांनी व्यक्त केले ते शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व आय क्यू एस सी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आदर्श शिक्षकांचा सत्कार विशेष व्याख्यान व शिक्षक सन्मान सोहळ्यात बोलत होते यावेळी शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विनायक जाधव हे या कार्यक्रमाच्या अध्यय स्थानी होते याप्रसंगी व्यासपीठावर किसन शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष नामदेवराव चामले उपस्थित होते याप्रसंगी उदगीर शहरातील माधव कदम राम जाधव मोहन खिंडीवाले सुमित्रा वट्टमवार व यशवंतराव बिरादार इत्यादी शिक्षकांचा त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला पुढे बोलताना डॉक्टर भोपळे यांनी वेळेचे महत्व स्पष्ट केले त्यासोबतच माणसाचा आयुष्यातील शिक्षकांनी शिक्षणाचे महत्त्वही स्पष्ट केले तर सकारात्मक उत्तर देताना राम जाधव यांनी शिक्षण व चांगल्या माणसाच्या सानिध्यामुळे मी कसा घडलो हे सांगितले याप्रसंगी इंजिनियर शिवाजीराव पाटील यांनी व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक बाबीवर प्रकाश टाकला अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉक्टर विनायकराव जाधव यांनी चांगले आयुष्य जगण्यासाठी शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही असे मत मानले राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक बालाजी सूर्यवंशी यांनी या कार्यक्रमाचे संयोजन व संचलन केले तर डॉक्टर किरण गुटे यांनी आभार व्यक्त केले याप्रसंगी उप प्राचार्य डॉक्टर आर एम टेकाळे डॉक्टर एसटी सावंत डॉक्टर विखे भालेराव डॉ तिरपुडे डॉक्टर रंजन व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते