यवतमाळ : एलआयसी एजंट लोकांच्या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी एलआयसी कार्यालयासमोर ऑल इंडिया लाईफ इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या एजंट यांनी आंदोलन केले. एलआयसीच्या विकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात येऊन मागण्या मान्य करण्यासाठी साकडे घालण्यात आले. यावेळी एजंट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
  
  
  
   
  