जो मणुष्य प्रज्ञा चे महत्व जाणतो त्याचे आचरण हे बहुजनांच्या हितासाठी व सुखासाठी असले पाहिजे. तो स्वतः अष्टांगिक मार्गाचे आचरण करणारा व अनेकांना ह्याच मार्गाचे आचरण करायला लावणारा असावा.तो मनुष्य सर्वांसाठी मनात चांगल्या विचारांची वृध्दी करणारा व वाईट विचार मनातून नष्ट करणारा असावा.तो स्वतःच्या मनावर त्याचा संपुर्ण अधिकार असावयास पाहिजे. तो मनाच्या आहारी नसावा.व त्याला स्वतः सोबतचं मानव समाजाच्या हिताचा,सुखाचा मार्ग सहजपणे साधता आला पाहिजे. अश्याप्रकारे तो माणुस पंचशील, अष्टांगिक मार्ग व दहा पारमिताच्या आचरणाने त्यांच्या जीवनाच्या संपुर्ण ज्ञानाने अकुशल व वाईट विचारांचा नाश करतो व आपले विमुक्त करण्याचे ज्ञान प्राप्त करतो. हे सर्व तो प्रज्ञेमुळेचं करू शकतो. माणसाच्या विकासात प्रज्ञेचे महत्व अधिक आहे हे बुध्दांचा धम्म ठामपणे सांगतो म्हणुन तो सद् धम्म ठरतो.
अनिल तायडे ता.अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा मालेगाव जि.वाशिम