गणपतीच्या अनुषंगाने केसनंद फाटा येथे विनापरवाना, धोकादायकरित्या खेळणी लावणाऱ्यावर गुन्हा दाखल

 गणपतीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विनापरवाना व सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता पाळणे लावणाऱ्या व्यावसायिकावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित पाळणे व्यावसायिकाने पुणे महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडे फक्त अर्ज केला होता परंतु त्यास परवानगी मिळाली नसतानाही सदरचा प्रकार सुरु होता.

      महेश बसप्पा हिरेकेरूर (वय ४६, रा. हडपसर) असे विनापरवाना पाळणे लावणाऱ्या व्यावसायिकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

      याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, केसनंद फाटा येथील सार्वजनिक मोकळ्या जागेमध्ये गणपतीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पाळणे, ड्रायगण, सलांबो, ब्रोक डान्स असे सहित्य लावून त्यामध्ये लोकांना खेळवीत असल्याची माहिती लोणीकंद पोलीसांना मिळाली असता पोलिसांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन खेळणीबाबतच्या परवानगीबाबत विचारपूस केली असता संबंधित व्यावसायिकाने फक्त महापालिका मालमत्ता व्यवस्थापन कार्यालयाकडे अर्ज केले असून अद्याप कोणतीही परवानगी मिळाली नसल्याचे समजले. लोकांकडून पैसे घेऊन त्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल व कोणतीही सुरक्षितता न बाळगता विनापरवाना व्यवसाय करीत असल्याने पोलीस शिपाई उमेश साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महेश हिरेकेरूर