धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने टपाल तिकिटाबाबत केंद्र शासन सकारात्मक आहे. टपाल तिकीट काढण्याबाबत खासदार गिरीश बापट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदन दिले होते. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमित सोनवणे यांनी ही माहिती दिली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने टपाल तिकीट काढण्यात यावे, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमित सोनवणे यांनी केली आहे. त्यांनी या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार गिरीश बापट यांना पत्र पाठवले होते.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
सोनवणे यांच्या पत्राला केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, 'तुमची मागणी रास्त आहे. हा मुद्दा 'पीएसी' कमिटीमध्ये मांडून त्यावर विचार केला जाईल,' असे केंद्र सरकारने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. टपाल तिकिटाबाबत केंद्र सरकार सकारात्मक असून, लवकरच यावर निर्णय होऊ शकतो, असे सोनवणे यांनी सांगितले.