परभणी: तालुक्यातील सिंगणापूर, औरंगाबाद येथील युवकांच्य खूनाच्या घटना व मातंग समाजावरील हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. सहभागी समाज बांधव
परभणी व राज्यात मातंग
समाजावर दिवसें दिवस अन्याय अत्याचाराच्या घटना होत आहेत. समाजावर हल्ले होत आहेत. मातंग समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाला आहे. राज्यातील प्रत्येक मातंगवाडा रक्तरंजीत झाला आहे. तालुक्यातील सिंगणापूर येथील गोविंद कांबळे या युवकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली. या सर्व घटनांच्या निषेधार्थं सोमवार ५ सप्टेंबर रोजी मातंग समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
परभणी तालुक्यातील सिंगणापूर येथील गोविंद कांबळे, औरंगाबाद येथील जनार्धन कासारे या युवकांच्या खूनाच्या घटना ताज्यात आहेत. या शिवाय राज्य दररोज कुठे ना कुठे मातंग
वस्तीवर हल्ला होतो. त्यामुळे समाजात मितीचे वातावरण पसरले आहे. मातंग समाजावर होणाऱ्या हल्ल्याकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी व गोविंद कांबळे, जनार्धन कासारे यांच्या विश्वजीत खूनाच्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ज्ञानोपासक साळवे, महाविद्यालय मैदानापासून निघालेल्या अशोकराव मोर्चात हजारो समाज बांधव सहभागी होते. मयत गोविंद कांबळे व जनार्धन कासारे यांच्या कुद्वियाचे पुनर्वसन करून समाज कल्याण विभागाकडून आर्थिक मदत द्यावी, दोन्ही खूनाच्या घटनाचा खटला जलदगती न्यायालयात मैदानावर चालवावा, मुख्यमंत्री निधीतून ५० लाखाची मदत मयतांच्या कुटुंबियास द्यावी, अॅट्रोसिटी अॅक्टनुसार आरोपीची संपत्ती जप्त करून तडीपार करावे, यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मोर्चात कॉ. गणपत मिसे, आले.
अभियानचे प्रा. डॉ. मिलिंद आव्हाड, विष्णु कसबे, सचिन साठे, मछिंद्र गवाले, सचिन क्षीरसागर, रावाजी शेळके, पप्पुराज शेळके, अरुण सोनवणे, कुणाल गायकवाड, उत्तम गोरे, अविनाश मोरे, प्रविण मोरे, मारोती साठे, वाघमारे, किशोर कांबळे, हेमंत उबाळे, विनोद गायकवाड आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आझाद क्रांती मोर्चाचे विसर्जन झाल्यानंतर मान्यवरांची भाषणे झाली. यानंतर निषेधाचे निवेदन जिल्हा प्रशासनास देण्यात