पाचोड येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा..
पाचोड -जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला .सर्वप्रथम भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे केंद्रप्रमुख बळीराम भुमरे यांच्या हस्ते पूजन केले. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते .त्यानंतर मुख्याध्यापक बळीराम भुमरे यांनी डॉ.राधाकृष्ण यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तद्नंतर शाळेतील इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी कुमारी स्वरूपा सचिन बडे हिने सर्व शिक्षकांचा पुष्प व पेन देऊन गौरव केला. शिवछत्रपती माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आज शाळेत स्वयंशासन दिन साजरा केला त्यांनी आज पाचोड शाळेत शिक्षकांची भूमिका निभावली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक बिभिसेन सुपेकर, गणेश सपकाळ, बालासाहेब घाडगे, आसाराम तांदळे, ज्योती आष्टीकर व अनिता फुंदे यांनी परिश्रम घेतले.