आष्टी (प्रतिनिधी)आष्टी तालुक्यातील कडा येथे बुधवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी आम आदमी पार्टीचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संयोजक व आपचे तालुकाध्यक्ष डॉ. महेश नाथ व सरपंच डॉ. राम बोडखे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिल्ली व पंजाब राज्यात आपचे सरकार आहे. भ्रष्टाचारमुक्त आणि फक्त विकासासाठी आपचे दोन्ही सरकार प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत आपचे नेते व कार्यकर्ते सक्रिय आहेत. महाराष्ट्रात आज प्रत्येक जिल्ह्यात आपचे कार्यकर्ते सर्वसामान्य लोकांच्या कामात पुढे आहेत. आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच राज्यातील जेष्ठ नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी आप मध्ये प्रवेश केला आहे. आपचे प्रदेशाध्यक्ष रंग
राचुरे यांच्या हस्ते कडा येथे होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी जेष्ठ नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे, आप पार्टीचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य अजित खोत, मराठवाडा संघटनमंत्री सुग्रीव मुंडे, सचिव अनिल ढवळे, जिल्हाध्यक्ष अशोक येडे, युवा जिल्हाध्यक्ष अशोक सोनगुडे, तसेच ज्ञानेश्वर राऊत, रामधन जमाले, सय्यद सादिक आणि अहमदनगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड, अहमदनगर शहराध्यक्ष राजेंद्र कर्डीले उपस्थित राहणार आहेत. कडा येथील महेश मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष डॉ महेश नाथ यांनी केले आहे .