चौसाळा बसस्थानकासमोरील हातभट्टी अड्डेयाचे काय? 

बीड (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील नेकनुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या चौसाळा येथे खुलेआमपणे हातभट्टी दारू विक्री होत असल्याची माहिती नेकनुर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांना कळताच आज त्यांच्या टिमने चौसाळा येथील भरवस्तीत चालणारा अवैध हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त करून दोनशे लिटर हातभट्टी रसायन व सत्तर लिटर गावठी हातभट्टी दारू फेकून देवुन हा भरवस्तीत चालणारा हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे व आरोपीला ताब्यात घेवुन त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई नेकनुर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख, पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, पोलीस उपनिरीक्षक पानपाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चौसाळा पोलीस चौकीचे ठाणे अंमलदार , बाबासाहेब डोंगरे, पो,ना,बळवंत, पो,ना, घुले, पो,ना, पुंडे, पो, ना, तांबे, महीला होमगार्ड आशा मस्के यांनी केली आहे.