श्रीवर्धन तालुक्यातील जावेळे. वडशेत वावे गावांना जोडणारा पुल कोसळून अडीच वर्षे पुर्ण झाली असुन नवीन पुला साठीचा अंदाजीत खर्च एक कोटी दहा लाख रुपयांचा आहे. संबंधित विभाग. राजकीय नेते मंडळी यांचे दुर्लक्ष याच्यामुळे जावेळे पुल अद्यापही त्याच अवस्थेत असून सार्वजनिक बांधकाम विभाग व रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागा यांनी पुलाचे काम लवकर सुरु न केल्यास शिवसेना तालुका संघटनेच्या वतीने रास्तारोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. नादुरुस्त पुलामुळे तालुक्यातील गालसुरे,जावेळे महाड खाडी मार्गे आंबेत,मंडणगड येथे जाण्यासाठी पर्यायी मार्ग असलेला रा.मा.९९ मार्गावरील प्र.जि.मा.४ साखळी क्र.२/४०० क्षेत्रातील जावेळे येथील पुल अडीच वर्षे कोसळलेल्या अवस्थेत असुन पर्यायी मार्ग म्हणून पुलाच्या बाजूला सिमेंटचे पाईप टाकून काँक्रिटीकरण रा.जि.प.बांधकाम विभागाने बांधून दिला आहे मात्र .पावसाळी दिवसात पुलावरून पाणी वाहत असल्याने बहुतेक वेळा वाहतूक तसेच माणसांची ये जा बंद करावी लागते.वाहतूक बंदचा फटका मात्र परिसरातील वडशेत वावे,साखरोणे,धारीवली,आडी या गावांना बसत असुन या गावांतील गोरगरीब नागरिक व ,विद्यार्थ्यांना श्रीवर्धन शहरात यायचे झाल्यास कोलमांडला,बागमांडला मार्गे श्रीवर्धन येथे यावे लागते.हा प्रवास खर्चिक व वेळेचा अपव्यय करणारा आहे. माजी पालकमंत्री आमदार आदिती तटकरे यांनी पुलासाठी नाबार्ड कडून मंजुरी आणण्याचे पर्यन्त केले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांकडून सांगण्यात येत असते परंतु जावेळे पुलाची अवस्था अडीच वर्षे होऊन सुध्दा जैसे थे आहे. जावेळे पुलाचे काम लवकरात लवकर
चालू न झाल्यास तसेच सप्टेंबर महिना अखेर पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग. रा.जि.प.बांधकाम विभागा यांनी पुलाबाबत काही भुमिका स्पष्ट न केल्यास आराठी येथे म्हसळा. बोर्ली पंचतन फाट्यावर रास्तारोको आंदोलन करणार असल्याचे श्रीवर्धन तालुका शिवसेना संघटना यांच्या कडून बोलले जात आहे.
वडशेत वावे,साखरोणे,धारीवली,आडी ही गावे पूर्वी पासून शिवसेनेची असल्यामुळे पुलाकडे राजकीय खेळी मुळे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले असून आता आमची सहनशीलता संपली HB आहे.पुलाचे काम लवकर सुरु न झाल्यास आराठी येथे रस्तारोको आंदोलन करण्यात येईल.आंदोलना दरम्यान काही नुकसान झाल्यास ती जबाबदारी राज्य शासनची असेल*
*तालुकाप्रमुख अविनाश कोळंबेकर*
==========================
*जावेळे पुलाबाबत तालुका शिवसेना पक्ष यांच्या मार्फत रास्तारोको आंदोलन पुकारनार आहे. त्या आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुर्ण पांठिबा असेल.कोसळलेल्या पुलामुळे सर्वच नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतं आहे*
*सागर सावंत.वडशेत वावे.मनसैनिक*