टाटा उद्योग समुहाचे माजी अध्यक्ष व उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा मुंबई – अहमदाबाद मार्गावर पालघर जिल्हात अपघात झाला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पालघर जिल्हा अधीक्षकांनी ही माहिती दिली आहे.

उद्योगपती सायरस मिस्त्री अहमदाबादहुन मुंबईकडे परतत असताना, झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावर सूर्या नदीवरील पुलावर सायरस मिस्त्री यांची मर्सिडीज कार दुभाजकाला धडकली. या अपघातामध्ये मिस्त्री यांच्या गाडीचा चालक गंभीर जखमी झाला आहे. तर सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. चालकाचे गाडीवर नियंत्रण न राहिल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात घडला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच सायरस मिस्त्री यांचे निधन झाले होते. त्यांचे पार्थिव आता टाटा रुग्णालयातून गुजरातमधील त्यांच्या घरी नेले जाणार आहे.मिस्त्री यांची गाडी दुभाजकाला धडकल्याने, वरील अपघात झाला असल्याचे समजते आहे.

टाटा समूहाचे सायरस मिस्त्री यांच्या गाडीचा अपघात . मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी येथे झाला अपघात . गाडीत एकूण चार जण असल्याची माहिती. सायरस मिस्त्री यांच्यासह एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी . जखमी ना उपचारासाठी वापी येथे हलवण्यात आले आहे.

पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, “दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास अहमदाबाद येथून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर सूर्या नदीच्या पुलावर हा अपघात झाला.

अपघातात दोन जखमी झाले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. ही मर्सिडीज कार होती. गाडीचा क्रमांक MH-47-AB-6705 असा आहे.

पुढील प्रक्रिया सध्या सुरु आहे”. दुभाजकाला गाडीने धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

सायरस मिस्त्री हे अब्जाधीश असलेल्या पालनजी शापूरजी यांचे ते पुत्र होत. त्यांनी टाटा ग्रुपला एका वेगळ्या वळणावर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अपघातामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे

रतन टाटा सेवानिवृत्त झाल्यावर टाटा समुहाचा कार्यभार सायरस मिस्त्री २९ डिसेंबर २०१२ रोजी हाती घेतला होता . मात्र त्यानंतर कांही वर्षातच रतन टाटा व सायरस मिस्त्री यांच्यात वाद सुरु झाल्याने, त्यांना टाटा उद्योग समुहावरुन पाय उतार व्हावे लागले होते.

दरम्यान देशातच नव्हे तर जगभरात बांधकाम उद्योगात गेल्या अनेक वर्षांपासून बस्तान बसलेल्या आणि तब्बल 8.8 अब्ज डॉलरची मालमत्ता असलेल्या पालनजी शापूरजी मिस्त्री यांचा धाकटा मुलगा म्हणजे सायरस मिस्त्री. गेल्या अनेक वर्षांपासून मिस्त्री आणि टाटा कुटुंबात कौटुंबिक ऋणानुबंध आहेत. मिस्त्री हे 2006पासून टाटा सन्सचे संचालक म्हणून कार्यरत असल्याने त्यांना कंपनीच्या कारभाराची व्यवस्थित माहिती आहे. 43 वर्षांचे मिस्त्री हे शापूरजी पालनजी समूहातील पालनजी मिस्त्री यांचे पुत्र असून त्यांच्याकडे टाटा सन्सचे तब्बल 18.5 टक्के समभाग आहेत.

4 जुलै 1968ला जन्मलेले सायरस यांचं शिक्षण झालं लंडनच्या इंपिरिअल कॉलेजमध्ये. त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली आणि त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण लंडन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये घेतलं. तिथे त्यांनी मास्टर ऑफ सायन्स मॅनेजमेंटमध्ये पदवी संपादन केली. ते इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनिअर्सचे फेलोदेखील होते. लंडनमध्ये उच्चशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कौटुंबिक व्यवसायात महत्त्वाच्या व्यवस्थापकीय जबाबदा-या पाहिल्या. टाटा ग्रुपशिवाय ते शापूरजी पालनजी अँड को., फोर्ब्स गोकॅक, अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर्स आणि युनायटेड मोटर्स इंडिया यांसारख्या कंपन्यांचे डायरेक्टर पददेखील सांभाळत होते.