बिडकिन येथील डि एम आय सी प्रकल्पातील चोरीचे सत्र सुरूच...

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

विद्युत वाहिनीच्या केबल चोरी प्रकरणी ०३ आरोपी अटक..

०३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली...

बिडकिन प्रतिनिधी:-

पैठण तालुक्यातील बिडकिन येथील डि.एम.आय.सी.प्रकल्पात चोरीच्या घटना जास्त संख्येने घडत असल्याचे दिसून येत आहे.डि.एम.आय.सी येथील विद्युत वाहिनीच्या केबल चोरी प्रकरणी काल उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असुन यात तीन आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अन्वर फसीयोद्दीन खान,वय ३६ वर्षे, प्रशासकीय अधिकारी L&T कंपनी व DMIC यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डि.एम.आय.सी.मधील रस्त्याच्या कडेला असलेल्या पावरडक वरचा ढापा पाडुन त्यातील विद्युत वाहिनीच्या ३ कोर २४० स्क्वेअर एम एम ची केबल तोडुन बाहेर काढून मोटारसायकल वरुन घेऊन जात असताना मिळुन आला आहे.यावेळी सुरक्षा सुपरवायझर करणसिंग काहिटे यांनी अडविले असता लोखंडी सळईने मारहाण करुन जबरदस्तीने विद्युत वाहिनीच्या केबल घेऊन गेले.याप्रकरणी कृष्णा धोंडिराम गोरडे, नामदेव ज्ञानदेव बोंद्रे दोघेही रा.वरुडी ता.पैठण व सुनिल संतोष गिरी रा.भुसावळ या तीन आरोपींना पोलिसांच्या वतीने ताब्यात घेण्यात आले असुन त्यांच्या कडिल विद्युत वाहिनीच्या केबल जिची किंमत ३०,०००/- रुपये व ४०,०००/- रू ची चोरीची मोटारसायकल,०३ मोबाईल व केबल कापण्यासाठी चे साहित्य असा एकूण ८७,५५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या घटनेतील तिन्ही आरोपींना पैठण न्यायालयात हजर केले असता प्रथम न्यायदंडाधिकारी यांनी ०३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश घुगे हे करीत आहेत..

रविंद्र गायकवाड, बिडकिन