मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) चे जे सदस्य त्यांच्या खात्यात व्याज येण्याची वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी असुन लवकरचं त्यांचे व्याजाचे पैसे त्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले जाऊ शकतात. सरकार सुमारे 6 कोटी खातेधारकांच्या खात्यावर व्याजाचे पैसे पाठवणार आहे. पीएफ खात्यात येणाऱ्या व्याजाच्या पैशांची माहिती घेण्यासाठी तुम्हाला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) कार्यालयात जाण्याची गरज नाही. यावर्षी खातेदारांना 8.1 टक्के दराने व्याज मिळेल.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
मिस्ड कॉल द्या तपासा PF...
मोबाईलवर घरी बसून तुमची PF शिल्लक तपासण्यासाठी आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 011-22901406 या नंबरवर एक मिस कॉल करावा लागेल. दोन रिंगनंतर हा कॉल ऑटोमॅटिक डिस्कनेक्ट होईल. यानंतर PF चा तपशील तुम्हाला EPFO च्या मेसेजद्वारे प्राप्त होईल. या सेवेसाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नसुन यूएएन पोर्टलवर रजिस्टर मेंबर्सना मिस्ड कॉल देऊन त्यांच्या खात्यातील बॅलन्स तपासता येईल.
Umang App च्या वर चेक करा
तुमचे उमंग App उघडा आणि ईपीएफओवर क्लिक करा. तुम्हाला एका वेगळ्या पेजवर इम्प्लॉयी-सेंट्रिक सर्विसवर क्लिक करावे लागेल. याठिकाणी व्ह्यू पासबुकवर क्लिक करा आणि तुमचा यूएएन नंबर आणि पासवर्ड एंटर करा. ओटीपी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड क्रमांकावर येईल. यानंतर तुम्ही तुमचा बॅलेन्स तपासू शकता. याठिकाणी तुम्ही पासबुक पाहण्याव्यतिरिक्त क्लेम देखील करू शकता. हे एक सरकारी App आहे. तुम्ही विविध सुविधांचा फायदा या अँपमधून घेऊ शकता.
मेसेजद्वारे तपासा बॅलेन्स...
मेसेजद्वारे तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरुन 7738299899 या नंबरवर मेसेज करावा लागेल. EPFOHO UAN ENG असे लिहून तुम्हाला हा मेसेज करावा लागेल. ENG म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये तुम्हाला माहिती मिळेल. परंतु तुम्हाला अन्य कोणत्या भाषेत माहिती हवी असेल तर ENG ऐवजी तुम्हाला हव्या असलेल्या भाषेची पहिली तीन अक्षरं तुम्हाला टाकावी लागतील. हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलुगु, तमिळ, मलयाळम आणि बंगाली भाषेमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. या क्रमांकावर मेसेज करण्यासाठी ईपीएफओ मध्ये तुमचा नंबर रजिस्टर्ड असणे गरजेचं आहे.
वेबसाइटवर तपासा बॅलेन्स
Epfindia.gov.in या वेबसाईटवर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ई-पासबुकवर क्लिक करावं लागेल. तुम्ही passbook.epfindia.gov.in या नवीन पेजवर याल. याठिकाणी युजर नेम, तुमचा UAN क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा कोड एंटर करून ई-पासबुकवर क्लिक करा. याठिकाणी एक नवीन पेज ओपन होईल. याठिकाणी मेंबर आयडीवर क्लिक करा आणि अशाप्रकारे तुम्ही खात्याचील रक्कम वेबसाइटच्या माध्यमातून तपासू शकता.