सेलू तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील लोअर दुधनाच्या डाव्या व उजव्या कालव्यात तात्काळ पाणी सोडण्यात यावे. अशी मागणी एका निवेदनाद्वारे सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मेल द्वारे केली होती. व त्यांच्या या प्रयत्नाला यश मिळाले असून रविवार ४ सप्टेंबर रोजी या दोन्ही कालव्यातून प्रत्येकी ५० क्यूसेस ने पाणी सोडण्यात येणार आहे.

          गेल्या २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे परिसरातील पाण्याअभावी खरिपातील पिके धोक्यात आली आहेत. सदर पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घासाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. 

           सध्या लोअर दुधना धरणात पुरेसा पाणी साठा उपलब्ध असल्यामुळे या धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याद्वारे तात्काळ पाणी सोडले तर या पिकांना निश्चितच जीवदान मिळू शकते. याचा फायदा परिसरातील जवळपास १०० शेतकऱ्यांना होऊ शकतो. अशी मागणी सेलूच्या दबाव गटाने केली होती. व त्यानुसार परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे.