अमरावती जिल्ह्यात लव्ह जिहादचा गंभीर प्रकार खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी बुधवारी (ता.३१) उघडकीस आणल्याने मोठी खळबळ उडाली होती मुस्लिमांकडून हिंदूंच्या मुलींना सातत्याने लक्ष केले जात असल्याने डॉ.बोंडे यांनी आक्रमक होत मुस्लिम समुदायाला गंभीर इशारा दिला आहे. ज्या बोगस संस्थेत हे विवाह लावण्यात येतात त्या चंद्रविला विवाह ट्रस्ट विरुद्ध फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे  

अमरावती येथील चंद्रविला विवाह ट्रस्ट कडून अवैधरित्या लग्न लावून देण्याचे अनेक प्रकार या आधी सुद्धा घडले आहेत मात्र या संस्थेचे मालक ऍड महेश देशमुख हे सेटिंग करून संस्थेवर कुठलीही कारवाई होऊ देत नाहीत त्यामुळे या संस्थेमार्फ़त असे अनेक बोगस विवाह या संस्थेमार्फ़त लावून देण्यात येतात हा संपूर्ण गंभीर प्रकार खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी गेल्या तीन दिवसाआधी उघडकीस आणला. धारणी येथील रुग्णवाहिकेवर चालक असणाऱ्या एका मुस्लिम युवकाने येथील उच्चविद्याविभूषित तरुणीला प्रेम जाळ्यात अडकवल्याचा प्रकार पुढे आला आहे. सदर युवकांने तीला विश्वासात घेत चंद्रविला या ट्रस्ट कडून अवैधरित्या लग्न लावून घेतले आहे सदर प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी केली असता चंद्रविला विवाह संस्थेला विवाह लावण्याचा कोणताही अधिकार नाही

सोबत ज्यांचे विवाह या संस्थे मार्फत लावून देण्यात आले आहेत ते सर्व कागद पत्रे बनावट असल्याचे हि निदर्शनास आले आहे