पती आणि शेजारी राहणाऱ्या कुटुंबाच्या सततच्या त्रासाला कंटाळलेल्या महिलेने गुरुवार रोजी पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर स्वतःला जाळून घेतले होते. या महिलेचा उपचारादरम्यान शुक्रवार रोजी पहाटे चार वाजता मृत्यू झाला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पती, शेजारी राहणारे तिघे आणि सहाय्यक फौजदाराच्या विरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा बेगमपुरा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. मृत पावलेल्या महिलेचे नाव सविता दीपक काळे (वय 34 राहणार मांडवा) तालुका गंगापूर आहे. यांनी पोलीस आयुक्तालय निवेदन दिल्यानंतर पायऱ्याजवळ अंगावर डिझेल ओतून गुरुवारी दुपारी बारा वाजता जाळून घेतले. घाटीत जळीत वार्डात उपचार करण्यात येत होते. त्यांचा शुक्रवारी चार वाजता मृत्यू झाला. मृताचा भाऊ शामसुंदर काकडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पती दीपक मनोहर काळे, शेजारी संगीता अशोक शेळके, अशोक शेळके ,गोकुळ अशोक शेळके आणि सहाय्यक फौजदार गायके यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.