जिंतुर तालुक्यातील विविध पक्ष, संघटनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

           परभणी दिनांक 3 सप्टेंबर रोजी- जिंतुर तालुक्यातील विविध पक्ष, संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला या प्रसंगी परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष मा.आ. सुरेशरावजी वरपुडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात काँग्रेस जिल्हाकार्यध्यक्ष मा. नानाभाऊ राऊत, मनपा उपमहापौर मा.भगवानराव वाघमारे, मनपा सभापती मा. गुलमीर खान, परभणी तालुकाध्यक्ष मा.पंजाबराव देशमुख, मा. समशेर वरपुडकर, मा.प्रकाशराव देशमुख, मनपा सदस्य विशाल बुधवंत , जिंतुर तालुकाध्यक्ष गणेशराव काजळे, इजि. मिडीया प्रमुख सुहास पंडीत, तहसीन देशमुख, अनवर पटेल, गुलाबराव ईखे, वामनराव लगड, अब्दुल सलाम, अनवर बेग, शेख ईब्राहीम, बाळु जिवने, प्रभाकर ईखे, पाशा पठाण, अंकुश ईखे, जालींदर जिवने, मुजाहीद कादरी, ज्ञानेश्वर सावळे, शेख ईब्राहीम, अब्दुल सलाम अदी पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेस पक्ष मजबुतीसाठी व प्रवेश केलेल्या सर्व सन्मानीय कार्यकर्त्यांच्या विकासासाठी सदैव कटीबद्ध असून सर्वतपरी मी आपल्या सोबत राहील अशी ग्वाही व भावना मा.आ.सुरेशरावजी वरपुडकर साहेबांनी व्यक्त केल्या तसेच मा.नानाभाऊ राऊत यांनी मा.आ.सुरेशरावजी वरपुडकर व मा.सुरेश नागरे यांच्या नेतृत्वाखाली जिंतुर मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व व काँग्रेस विचारधारा तळागाळापर्यंत पोहचवेल असे वक्तव्य केले. यावेळी अडीचशे कार्यकतर्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन जिल्हयाच्या विकासासाठी एक पाऊल पुढे टाकत हा पक्षप्रवेश करत असल्याची भावना कार्यकर्त्यांनी केली. यामध्ये माजी उपसभापती मोबीन कुरेशी, ग्रा.प.सदस्य आन्ना हराळे, सदाशिवअण्णा घुगे, रियासोद्दीन बाबामियॉ शेख, गुलाब पाशा नाईक, अ. रौफ अन्सारी, बाबुराव सोनवणे, बाबासाहेब बहीरट, रविभाऊ देशमुख, बाळुभाऊ देशमुख, प्रल्हादराव देशमुख, महेबुब पट्टेदार, उत्तमराव सांगोळे, शेख एजाजभाई, हाजी बशीर पठाण, मुंजाभाऊ बहीरट, सचिन बहीरट, अमोल बहीरट, बाळुभाऊ बहीरट, संजय बहीरट, अशोकराव शिंदे, बाळुभाऊ वडावाले, शेख समदभाई, हसन शेख, संजय घनवटे, शेख जमालभाई, अक्षय सोनवणे, अनवर बेग, बाळु सभांजी जिवणे असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उध्दवराव रामपुरीकर यांनी केले तर इजि.सुहास पंडीत यांनी आभार मानले.