श्री गणेश मित्र मंडळाचा गणपती उत्सव थाटात

विशेष/ प्रतिनिधी. 

लोणी (ता.परतुर) येथील श्री गणेश मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात येत आहे. लोणी येथील युवा नेते कैलास भिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्त मंदिरात गणरायाची प्रतिस्थापना करत उत्सवास सुरुवात झाली. गावातील मानाचा गणपती याच मंदिरात अनेक वर्षापासून विराजमान आहे. 

    या गणेशोत्सवा दरम्यान गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण मुल यांच्यासाठी खास सार्वजनिक कीर्तनाचे आयोजन मंडळाच्या वतीने केले आहे.कीर्तनाचा लाभ सर्वानी घ्यावा असे आवाहन कैलास यांनी केले आहे. यावर्षी गावातील ग्रामस्थांकडून कोणतीही वर्गणी  जमा न करता फक्त मंडळातील कार्यकर्त्यांच्या सभासद वर्गणीतून हा गणेशोत्सव साजरा होत आहे. नवव्या दिवशी सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल आणि अनंत चतुर्दशी दिवशी शांततेत गणेशाचे विसर्जन करण्यात येणार आहे असे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. 

  आरती प्रसंगी उपस्थित कैलास भिंगारे,सुनील नांगरे, प्रभाकर काकडे,ज्ञानेश्वर शिंदे, मच्छिंद्र शिंदे,आकाश बेरसले, हनुमान भिंगारे,विकास भिंगारे, अभिजीत भिंगारे,रंगनाथ कवळे, विजय चौरे,विलास जराड, कैलास जराड,गणेश ननवरे, ओंकार यादव,शरद बेरसले, शुभम यादव, शरद यादव, परमेश्वर शेळके,श्याम शेळके, महेश यादव,गणेश राऊत,लखन गायके यांच्यासह मंडळातील कार्यकर्ते.