परभणी,दि.19(प्रतिनिधी) :महानगरपालिकेंतर्गत मूलभूत सोयी सुविधांचे प्रश्‍न प्राधान्याने सोडविण्याकरीता सर्वतोपरी प्रयत्न करु, असा विश्‍वास नवनियुक्त आयुक्त सौ. तृप्ती सांडभोर यांनी व्यक्त केला.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

              पनवले महानगरपालिकेंतर्गत अतिरिक्त आयुक्त सांडभोर यांनी गुरुवारी (दि.01) सकाळी 10.30 वाजता परभणी महापालिकेत दाखल होवून मावळते आयुक्त देविदास पवार यांच्याकडून आयुक्त पदाचा पदभार स्विकारला. यावेळी अधिकारी कर्मचार्‍यांतर्फे मावळते आयुक्त व नवनियुक्त आयुक्त या दोघांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी नवनियुक्त आयुक्त सांडभोर यांनी सर्व विभाग प्रमुखांची ओळख करुन घेतली. त्या पाठोपाठ विभागनिहाय बैठका घेतल्या जातील, असे नमूद केले. तसेच महानगरपालिकेची आर्थिक स्थिती, रिक्त पदे, कंत्राटी पदे, वगैरे गोष्टींची माहिती घेतली. महापालिकेंतर्गत लोकसंख्या, वस्त्या तसेच नागरीकांना पुरविल्या जाणार्‍या नागरी सोयी सुविधांसंदर्भातही आढावा घेतला.

आयुक्त सांडभोर यांनी बोरवंड (ता.परभणी) या ठिकाणी जावून तेथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी केली. हा प्रकल्प दीर्घकाळ रेंगाळल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले. प्रकल्प पूर्ण क्षमतेने लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा, असे सुचवून या कचर्‍याचा आसपासच्या शेतकर्‍यांना त्रास होणार नाही, याचीही दक्षता बाळगा असा आदेश दिला.

              आयुक्त सांडभोर यांनी सायंकाळपर्यंत काही नागरीकांची निवेदने स्विकारली. काहींबरोबर सुसंवाद साधून आढावा घेतला. महापालिकेंतर्गत पाणी पुरवठा योजना अन्य मूलभूत सोयी-सुविधा या संदर्भातही चर्चा केली.

              यावेळी उपायुक्त मनोज गग्गड, महेश गायकवाड, शहर अभियंता वसीम पठाण, आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत, के.के. आंधळे, के.के. भारसाखळे, मिनहाज तन्वीर, मोहम्मद मंजूर, मोहम्मद शाहेर, पंकज देशमुख, शिवाजी सरनाईक, विकास रत्नपारखे, गजानन जाधव, अमोल जाधव, माहिती व जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव आदींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मिर्झा तन्वीर बेग, करण गायकवाड, श्रीकांत कुर्‍हा, विनय ठाकूर आदी उपस्थित होते. आयुक्तांनी महापालिकेंतर्गत काही प्रभागांनासुध्दा भेटी द्यावयाचा निर्णय घेतला.

गणेश मंडळांना सुविधा पुरवा..

              महानगरपालिका हद्दीतील गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा होत असून गणेश मंडळांना व गणेश भक्तांना महापालिका प्रशासनाने सर्वतोपरी सुविधा पुरवाव्यात, असे आदेश नवनियुक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिले आहेत. परभणी शहरांतर्गत रस्त्यांची अवस्था, खड्डे बुजविण्या संदर्भात ताडीने हालचाली कराव्यात, असेही आदेश दिले.