*आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याची मागणी* 

*रासप व गुट्टे काका मित्र मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना दिले मागणीचे निवेदन* 

परभणी 

सध्या गणेशोत्सव सर्वत्र अगदी थाटामाटात साजरा होताना आपण पाहत आहोत. हा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी गंगाखेड पोलीस प्रशासनाने शहरातील संत जनाबाई महाविद्यालय येथे दि.२९ ऑगस्ट रोजी शांतता समिती बैठक आयोजीत केली होती. यावेळी विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, पोलीस प्रशासनातील पोलीस अधिकारी यांच्यासह आ.डॉ. रत्नाकर गुट्टे उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केल्यानंतर गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आ.डॉ. रत्नाकर गुट्टे हे आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी उभे राहिले. पुढे बोलतांना त्यांनी उपस्थित अधिकारी व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना हा गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर स्थानिक पोलीस प्रशासनाने गंगाखेड मतदारसंघातील अवैद्य धंदे बंद व्हावीत यासाठी तात्काळ पावले उचला कोणालाही पाठीशी घालू नका अशी सूचना केली. याप्रसंगी पोलिसांनी लोकप्रतिनिधीशी हुजत घालत आमदार डॉ. रत्नाकररावजी गुट्टे यांच्यावर दि. ३० ऑगस्ट २०२२ रोजी रात्री १० वा. पोलीस स्टेशन गंगाखेड येथे पोलिसांची बदनामी केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल केला. या घटनेच्या निषेध म्हणून आ.डॉ. रत्नाकर गुट्टे (काका) मित्र मंडळ व राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सदरील गुन्हा मागे घेण्यासंदर्भात मा. तहसीलदार गंगाखेड यांना निवेदनाद्वारे मागणी केली.

      शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू असून ते बंद करणा अशा सूचना दिल्या. पोलीस प्रशासनाने अवैध धंदे बंद करा असे आ. गुट्टे यांनी म्हटल्यामुळे त्याचा राग मनात धरून पोलीस प्रशासनाने आ. गुट्टे यांच्यावर पोलिसांची बदनामी केली म्हणून गुन्हा दाखल केला. यापूर्वी आमदार महोदयांनी मतदारसंघातील दारू, मटका, जुगार, चोरी, महिलांची छेड, खून इत्यादी घटना थांबाव्यात व शहरासह ग्रामीण भागात शांतता नांदावी अशा पोलीस प्रशासनाला वारंवार सूचना दिल्या होत्या. गणपती महोत्सवा संदर्भात शांतता कमिटीची बैठक असल्याने हा विषय आ. गुट्टे यांनी या बैठकीत मांडला असता उपविभागीय पोलीस अधिकारी श्रेणिक लोढा, गंगाखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील माने, पोलीस उपनिरीक्षक इजलकर यांनी हातवारे करून मोठ्या आवाजात बोलत आमदार गुट्टे यांच्या अंगावर धावून आले. स्थानिक पोलीस प्रशासन आमदार गुट्टे त्यांच्या कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना नाहक त्रास देत आहेत. आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्याव दाखल केलेला गुन्हा पोलीस प्रशासनाने परत घ्यावा. अन्यथा या घटनेचा निषेध म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष व आ.डॉ. रत्नाकर गुट्टे (काका) मित्र मंडळाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि पुढील परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असे या निवेदनात म्हटले आहे.  

          याप्रसंगी गुट्टे काका मित्र मंडळाचे जिल्हा अध्यक्ष श्री प्रल्हादराव मुरकुटे, रासप जिल्हा अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, विधानसभा अध्यक्ष कृष्णाजी सोळंके, मित्र मंडळाचे तालुका अध्यक्ष रामप्रसाद सातपुते, नगरसेवक सत्यपाल साळवे, राधाकृष्ण शिंदे, दलित आघाडी जिल्हाध्यक्ष राहुल बनाटे, ओबीसी सेल विधानसभा अध्यक्ष ब्रिजेश कोरे, गंगाखेड शहराध्यक्ष धनंजय भेंडेकर, गंगाखेड शहर कार्याध्यक्ष इकबाल चाऊस, गंगाखेड शहर व्यापारी आघाडीचे अध्यक्ष सचिन नाव्हेकर, प्रताप मुंडे, इंतेसार सिद्दिकी, शेख खालेद, महेश शेटे, पप्पू घरजाळे, एकनाथ गेजगे, जयदेव मिसे, वैजनाथ टोले, उद्धव शिंदे, गोविंद वाघमारे, पंडित घरजाळे, मुंजा शिंदे, शेख वजीर, रमेश शिसोदे आदी उपस्थित होते.