बीड (प्रतिनिधी) पुरोगामी पत्रकार संघ संलग्न राशन हक्क समिती मराठवाडा अध्यक्ष पदीचंद्रकांत कांबळे यांची निवड पुरोगामी पत्रकार संघाचे स. आ. विजय सुर्यवंशी, प्रदेश अध्यक्ष विजयकुमार वाव्हाळ, प्रदेश कार्याध्यक्ष प्रा. दशरथ रोडे, प्रदेश संघटक भागवत वैद्य,मराठवाडा अध्यक्ष विनोद काळे यांच्या आदेशाने राशन हक्क समिती बीड जिल्हा उपाध्यक्ष इनामदार यांनी केली. चंद्रकांत कांबळे हे हे झी24 न्यूज चॅनल चे बीड जिल्हा प्रतिनिधी आहेत. त्यांचे सामाजिक, न्याय, हक्क ,आर्थिक शेत्रात चांगले कार्य आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरोगामी पत्रकार संघ संलग्न राशन हक्क समिती मराठवाडा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. या वेळी भागवत वैद्य,तालिब शेख, अँड. दैवशाला शिंदे मॅडम, सुनंदा केदार मॅडम,समीर काझी,इनामदार ,कांबळे मॅडम,शिंदे गणेश,सतीश सोनवणे आदी उपस्थित होते.