जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे धर्मादाय रुग्णालयांच्या बाबतीत पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्यासोबत  महत्वपूर्ण बैठक पार पडली.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

या रुग्णालयात गरीब रुग्णांवर मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार केले जातात. रुग्णालयातील अशा रुग्णास बाहेरून औषधे आणावयास लावू नये. अशा रुग्णांसाठी लोकप्रतिनिधींनी दिलेल्या पत्राची तत्परतेने योग्य ती दखल घेतलीच पाहिजे. रुग्णालयात २४ तास जनसंपर्क अधिकारी उपलब्ध असावेत या सह अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाल्याची माहिती  आमदार अशोक पवार यांनी दिली.

काही रुग्णालये उत्तम कामगिरी करत आहेत, त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन परंतु अद्याप अनेक रुग्णालयात या अनुषंगाने सुधारणा होणे गरजेचे आहे असे मत देखील आमदार अशोक पवार यांनी यावेळी व्यक्त केले

यावेळी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख , धर्मदाय सह आयुक्त  बुके , प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली  तसेच धर्मदाय रुग्णालयांचे जनसंपर्क अधिकारी उपस्थित होते.