परळी
परळी फेस्टिवल च्या गणरायाची लोकनेते तथा परळी फेस्टिव्हलचे मुख्य मार्गदर्शक संस्थापक प्रा.टी.पी. मुंडे यांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठा व विधिवत पूजा करून आणि आरती संपन्न झाली. शेतकऱ्यावरील दुःखाचा डोंगर दूर कर असे साकडे घालून प्रार्थना केली तसेच परळी फेस्टिव्हल अंतर्गत असलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
तेवीस वर्षापासून परळीतील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील दर्जा सुधारावा यासाठी परळी फेस्टिवल सुरू केला होता.लोकनेते तथा परळी फेस्टिवलचे संस्थापक व मुख्य मार्गदर्शक प्रा. टी .पी .मुंडे यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली होत असलेल्या परळी फेस्टिवलच्या माध्यमातून समाज प्रबोधन, मनोरंजन ,किर्तन ,भीम गीत, कवाली आदीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन गेल्या 23 वर्षांपासून यशस्वीपणे अविरत चालू आहे. परंतु गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले नाहीत. यावर्षीही पाऊस दडी मारून बसल्यामुळे शेतकऱ्याच्या शेतातील पिके पाण्याविना सुकून गेल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे साध्यापद्धतीने श्रीची स्थापना करण्यात आली.
यावेळी प्रा.नरहरी काकडे, शिवरत्नजी मुंडे, मुळे , अनिल मस्के, सुदाम लोखंडे , विश्वनाथ गायकवाड, रघुनाथ डोळस, नितीन शिंदे, अँड.संजय जगतकर ,डॉ. माणिक कांबळे, कृष्णा लोंढे, ,मनोहर मुंडे, अँड.मनोज संकाये, राहुल कांदे, शिवा बडे, मिलिंद शिरसागर, श्रीमंत कांगणे ,प्रवीण घाडगे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.डी. मुंडे ,प्रा.सचिन डहाळे,नरहरी मुंडे आदी उपस्थित होते.उपस्थिताचे स्वागत परळी फेस्टिव्हलचे अध्यक्ष प्रा .विजय मुंडे यांनी केले.