राहुल गांधींना इटली झालं पोरकं; सोनिया गांधींना मातृशोक

दिल्ली:- काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या आई श्रीमती पाओला माइनो यांचे शनिवारी 27 ऑगस्ट2022 रोजी इटलीतील त्यांच्या घरी निधन झाले.त्या 97 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर काल इटलीत अंत्यसंस्कार करण्यात आले, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्वीट करत दिली आहे. सोनिया गांधी त्यांचा मुलगा राहुल गांधी आणि मुलगी प्रियांका गांधी यांच्यासोबत चिकित्सा तपासणीसाठी परदेश दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी हे त्यांच्या आजीच्या खूप जवळ होते. जेव्हा जेव्हा वेळ आणि संधी मिळेल त्यावेळी राहुल गांधी आजीची भेट घेण्यासाठी इटलीला जात असे.राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा गेल्या काही वर्षांत त्यांच्या आजीला भेटण्यासाठी अनेक वेळा इटलीला जात होते. 2020 मध्ये जेव्हा राहुल गांधींना त्यांच्या वारंवार परदेश दौऱ्यांवरून टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी पक्षाने राहुल गांधी त्यांच्या आजारी आजीची भेट घेण्यासाठी इटलीला गेल्याचे सांगितले होते.2018 मध्ये राहुल गांधी होळी साजरी करण्यासाठी आणि आजीला सरप्राईज देण्यासाठी इटलीला गेले होते. त्यावेळी त्यांनी ट्विटरवर काही भावना व्यक्त केल्या होत्या. ज्यात त्यांनी 'माझी आजी ९३ वर्षांची आहे. ती खूप दयाळू आहे. मी या वीकेंडला होळीच्या दिवशी तिला सरप्राईज देण्यासाठी जाणार असून, तिला मिठी मारण्यासाठी अजून वाट बघू शकणार नाही असे लिहिले होते