मुरमा शिवारात वीज पडून एक पती-पत्नी जखमी..
पाचोड(विजय चिडे) शेतातील काम आटोपून घरी बैल गाडीतून घरी येत असताना वीज कोसळून पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि.३१) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मुरमा ता.पैठण परिसरात घडली असून १)जगदीश बापूराव बाबरे (वय३८))कालिंदा जगदिश बाबरे-(वय ३६) असे जखमी झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की,पैठण मुरमा येथील जगदीश बाबरे व त्याच्या पत्नी कालिंदा बाबरे हे दिवसभर शेतात काम करून घरी जाण्यासाठी निघाले असता सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरण बदलून गेले.वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. तेव्हाच शेतात वीज पडली. त्यात दोघेजण गंभीर भाजले गेले आहे. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाली असता त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन जखमी झालेल्या पती-पत्नीला तात्काळ खाजगी वाहनाव्दारे तात्काळ पाचोड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून वैद्यकीय अधिकारी शिवाजी पवार यांनी जखमीवर प्राथमिक उपचार करुन जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.