औरंगाबाद:- दि.३१ (दीपक परेराव) औरंगाबाद शहरातील ग्रामदैवत असलेले संस्थान गणपती मंदिरातुन शहरात कोणतेही धार्मिक शोभा यात्रा,मिरणवूक महापुरुषांच्या जयंत्या,येथूनच श्री गणपती बाप्पा चे दर्शन घेऊनच सुरू होते अशी प्रथा आहे.आज गणेशोत्सवानिमित्त शहरातील शिवसेना, भाजप, काँग्रेस सर्वच नेते,मंत्री,आजी माजी आमदार ,नगरसेवक ,गणेशोत्सवानिमित्त ग्रामदैवत संस्थान गणपती मंदिरात सर्वपक्षीय आरती सोहळा मोठ्या उत्साहात करण्यात आली असून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपचे सहकार मंत्री अतुलसावे यांचा हात धरून नाचवले, शिवसेना विरोधी पक्ष नेता यांनी अतुल सावे यांच्या सोबत फुगडी खेळून या निमित्ताने सर्वांनीच आनंद व्यक्त केला.यावेळी मंत्री अतुल सावे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे,पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता, विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे,माजी महापौर नंदकुमार घोडीले,श्री गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार ,अनिल मकरिये, विजय औताडे,जगन्नाथ काळे,भाऊसाहेब जगताप आदी शिवसेना,भाजप, कॉग्रेस ,राष्ट्रवादी सर्वच पक्षाचे नेते उपस्थित होते.