परळी
आजपासून सुरू होणाऱ्या गणेश महोत्सवात आपल्या घरी गणेश मूर्ती बसवण्यासाठी परळी शहरातील नागरिकांनी मोंढा भागात गणेशमूर्तींच्या दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. वाढलेल्या गणेश मूर्तींच्या किमती असल्या तरी नागरिकांनी आपल्या पसंतीनुसार गणेश मूर्ती खरेदी केल्या.
परळी शहरात गणरायाची मूर्ती घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे कोरोना काळाच्या दोन वर्षाच्या ब्रेकनंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे गणेश भक्तामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून श्री गणरायांची मूर्ती घेण्यासाठी परळी शहर नागरिकांनी मोठी गर्दी केली.
तर गणेश मूर्ती विक्रीसाठी ठिकठिकाणी स्टॉल लावण्यात आले असून ढोल ताशाच्या गजरात आज गणरायांचे आगमन झाले आहे