मेडिकल कॉलेज जमिनीच्या पाहणीसाठी आलेल्या दिल्ली एम्सच्या टीमसोबत आमदार डॉ देवरावजी होळी यांची चर्चा
मेडिकल टीमचे आमदार महोदयांनी केले स्वागत
मुख्यमंत्री व उपमुख्यमत्री यांनी गडचिरोली मेडिकल कॉलेजच्या जमीन पाहणीसाठी पाठविली एम्स मेडिकलची टीम
मेडिकल कॉलेजच्या कामाची तातडीने दखल घेतल्याबद्दल आमदार डॉ देवरावजी होळी यांनी मानले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार
कृषी महाविद्यालयाच्या व त्या लगत लागून असलेल्या जलसंपदा विभागाच्या बाजूची, रुग्णालयाच्या मागील जागेची तसेच खाजगी जागेचीही केली पाहणी
दिनांक २९/०७/२०२२ गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यात नुकतेच मंजूर केलेले मेडिकल कॉलेज लवकरात लवकर सुरू व्हावे त्याची तातडीने दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री ना .एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना देवेंद्रजी फडणवीस यांनी गडचिरोली मेडिकल कॉलेजच्या जमिनीच्या पाहणीसाठी दिल्लीहून मेडिकल टीम पाठवली. त्या टीमची आमदार डॉ.देवरावजी होळी यांनी पोलीस विश्रामगृहात भेट घेतली व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिलजी रूढे वैद्यकीय अधिकारी डॉ. बागराज धुर्वे प्रामुख्याने उपस्थित होते.
गडचिरोली येथे मेडिकल कॉलेज तातडीने सुरू व्हावे याकरिता आमदार डॉ देवरावजी होळी मागील दिवसांपासून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या संपर्कात असून त्याची दखल घेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी गडचिरोली मेडिकल कॉलेजच्या जमिनीसाठी दिल्लीहून मेडिकल टीमला पाठविली
जमिनीची पाहणी करण्यासाठी आलेल्या मेडिकल टीमने जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागून असलेल्या कृषी महाविद्यालयाच्या व त्या लगत लागून असलेल्या जलसंपदा विभागाच्या बाजूची, रुग्णालयाच्या मागील जागेची तसेच खाजगी जागेचीही पाहणी केली. त्यानंतर मेडिकल कॉलेजला आवश्यक असलेल्या जमिनी संदर्भात त्यांनी आमदार महोदयांशी चर्चा केली.
मेडिकल कॉलेजच्या संदर्भातील मागणीची तातडीने दखल घेऊन मेडिकल टीम पाठवल्याबद्दल आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले आहे.