न्यायालयाने बजावलेले अजामीनपात्र वारंटमध्ये अटक न करण्यासाठी लोणी-काळभोर पोलीस स्टेशन पोलीस अमलदाराने तक्रारदाराकडे पाच हजार रुपयाची मागणी केली यावर आज दोन हजार रुपये स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ताब्यात घेण्यात आले.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार,लोणी-काळभोर पोलीस स्टेशन मध्ये कर्तव्यावर असलेल्या अंमलदार याने तक्रारदारावर बजावण्यात आलेल्या अजामीनपात्र वॉरंट मध्ये अटक करु नये यासाठी पाच हजार रुपयाची लाच मागितली यावर तक्रारदार यांनी याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली त्यावर काल पडताळणी करण्यात आल्यानंतर आज सकाळी लोणी-काळभोर पोलीस स्टेशन समोर दोन हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुकुंद रणमोडे व खाजगी इसम गजेंद्र माणिक थोरात यांना अटक केली.गुन्हा दाखल करण्याचे काम लोणी-काळभोर पोलीस स्टेशनमध्ये चालू आहे.
ही कारवाई कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे,अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजयमाला पवार यांनी केली.