राजगाव दांडगा येथे कुत्र्याचा हल्यात हरणांचा मृत्यू

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

पाचोड(विजय चिडे)पैठण तालुक्यातील रांजगाव दांडगामध्ये शेतात चरणाऱ्या हरणांवर कुत्र्याने हल्ल्या चढवला असल्यामुळे हरण जखमी होऊन त्या हरणाचां बुधवारी (दि.३१) पाहाटे चारच्या दरम्यान मृत्यू झाल्याची घटना उडकीस आली.

सविस्तर माहीती अशी की,यंदा सर्वत्र पावसाळा चांगला असल्यामुळे पिके जोमत आली त्यामुळे परिसरात कुत्रे अन्न पाण्याच्या शोधात शेतातील तूर,कपासीच्या तासाला जप धरून बसलेले असतात.त् यामूळे हरणे आपल्या कळपा सोबत कपासीत आल्याच क्षणी कुत्रेसह अन्य प्राणी हरणावरती झडप मारून शिकार करत आहे. मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास हरणाच्या कळपातून एक हरिण रस्ता भरकाटून गावात शिरले असता गावातील मोकाट कुत्र्याने त्या हरणावर हल्ला चढवला मात्र कुत्रे भुकण्यांचा आवाज येते असल्यामुळे गावातील संरपच सिध्दार्थ मगरे,पोलिस पाटील शाम शेजूळ,

शेख अनिस मेहबुब,अश्पाक शाम्हद,घनशाम मोरे सह अन्य नागरिकांनी या हरणांला कुत्र्याच्या तावडितून सोडवीले मात्र त्या हरणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गावातील नागरिकांनी वनविभागाला या संदर्भात दुरव्धनीवरुन संपर्क केला मात्र अधिकारी आले नसल्यामुळे त्या हरणास योग्य उपचार भेटला नसुन या अधिकाऱ्यांच्या हलर्गजीपणामुळे त्या हरणाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला असुन अजूक किती हरणांचे मृत्यू झालेवर या अधिकाऱ्यांना जाग येणार ? तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे जातीने लक्ष घालून हरणाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहे.बुधवारी दुपा वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कर्मचारी घटनास्थळी येऊन मृत्यू अवस्थेत असलेल्या हरणांला उतरीय तपासणीसाठी पशुवैद्यकीय दावखान्यात दाखल देण्यात आले आहे.