केज (प्रतिनिधी) मांजरसुंभा रोडवर पहाटेच्या सुमारास अपघात झाला असुन गणरायाच्या आगमना दिवसीच अपघात घडला आहे.काल अपघात होऊन आई व मुलाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने जिल्हा हळहळला आहे. आज बुधवार या दिवसाची सुरुवात अपघाताने झाली आहे. ओम साई राम ही पुणे-नांदेड ट्रॅव्हल्स केज-मांजरसुंभा रस्त्यावर मस्साजोग जवळ एका पुलाखाली कोसळली आहे. नशीब बलवत्तर म्हणून प्रवासी सुखरूप असून ४ जण जखमी आहेत. त्यांना केज येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.बीड जिल्ह्यातील वाढते अपघात पहाता येथील नवीन रस्ते अपघात महामार्ग बनल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. मंगळवारी जिल्ह्यात बीड-परळी रस्त्यावर सिरसाळा येथे भीषण अपघाताची घटना घडली. यानंतर सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास धारुर जवळ आरणवाडी साठवण तलावात फॉर्च्युनर कोसळली आज बुधवार या दिवसाची सुरुवात ही अपघातानेच झाली. आज पहाटे पुणे येथून नांदेडकडे जात असलेली ओम साई राम ही ट्रॅव्हल्स केज तालुक्यातील मस्साजोग जवळ आली असता ती रस्ता सोडून पुलाखाली जाऊन कोसळली आहे. सर्व प्रवासी साखर झोपेत असताना ही घटना घडली एकच गदारोळ झाला. यामध्ये सुदैवाने जिवितहानी टळली.परंतु करपेवाड कान्होपात्रा, जयश्री जोंधळे,उषा रानेवाड,सीताबाई माळी हे चार जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती देताच १०८ रुग्णवाहिकेतून जखमींना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केज पोलिस घटनेची चौकशी करत आहेत.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं