गंगापूर (आप्पासाहेब गोरे )

 गंगापूर नगरपरिषदेकडुन नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने साईदर्शन सोसायटीच्या संतप्त महिलांनी नगरपरिषदेच्या मुख्य प्रशासन अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन संताप व्यक्त केला नगरपरिषद च्या गलथान कारभारामुळे पाणी पाईपलाईन वारंवार लिंकेज व फुटत आहेत साईदर्शन काँलनी मध्ये महिन्यात एकदा किंवा.दोनदा पाणी येते हा भुर्दंड येथील नागरिकांना सहन करावा लागत असून.सोसायटिमध्ये नियमित व सुरळीत पाणी पुरवठा होत नाही त्यामुळे वारंवार विकत पाणी घ्यावे लागते ते न परवडणारे आहे परंतु वारंवार हिच बाब उदभवत असल्याने आज संतप्त झालेल्या महिलांनी भर हरतालिकेच्या दिवशी नगरपरिषद गाठवून निवेदन दिले जर दोन दिवसात पाणी आले नाही तर भव्य दिव्या मोर्चा तहसील कार्यालय गंगापूर येथे जाण्याचा इशारा देण्यात आला यावेळी सोसायटीच्या आशा भालेकर ,शकुंतला डाके, रुपाली काळे ,मनिषा राजपूत, पुजा साळुंके यमुना शिर्के राधाबाई, अनुराधा पिठले , प्रतिभा भुसे, कांबळेताई ,लोखंडे ताई सुरेश काही वळे सचिन भालेकर पुष्पा वाघचौरे, स्वप्नाली काळे, चंद्कला तुपे आदिसह मोठ्या संख्येने यहिला उपस्थित होत्या