विरोधी पक्ष नेते मा.अजीतदादा पवार साहेब यांची भेट घेऊन शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केली चर्चा

गडचिरोली जिल्हयात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्या.

गडचिरोली:- या वर्षी गडचिरोली जिल्हयात अतिवृष्टी व पुरामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हयात ओला दुष्काळ जाहीर करून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी,अशी मागणी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी विरोधीपक्षनेते मा. अजीतदादा पवार साहेब यांच्याकडे केली आहे.विरोधी पक्ष नेते मा.अजीतदादा पवार साहेब हे काल गुरूवारी गडचिरोली जिल्हयातील पुरग्रस्तभागाची पाहणी करण्यासाठी आले असता अरविंदभाऊ कात्रटवार यांनी त्यांची विश्रामगृहात भेट घेऊन जिल्हयातील पिकाच्या नुकसानीबाबत चर्चा केली.अरविंदभाऊ कात्रटवार यांनी विरोधी पक्ष नेते मा.अजीतदादा पवार साहेब यांच्यांशी चर्चा करतांना निदर्शनास आणून दिले की, गडचिरोली जिल्हा उद्योगविरहीत असून शेती हेच उपजिविकेचे साधन आहे.गडचिरोली जिल्हा अतिशय मागासलेला असून उद्योग विरहीत जिल्हा आहे. जिल्हयातील 80 टक्के नागरिकांची उपजिवीका शेतीवर अवलंबून आहे. जिल्हयात अल्पभूधारक शेतकरी संख्या अधीक आहे. जिल्हयात खरीप हंगामात 2 लाखापेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रातील पिकाची लागवड केली जाते. धान पिक हे जिल्हयातील प्रमुख पिक आहे. त्याचबरोबर कापूस, सोयाबीन हे पिक सुध्दा काही प्रमाणात घेतले जाते.गडचिरोली जिल्हयात मागील पंधरा विस दिवस अतिवृष्टी झाली. तसेच गोसीखुर्द व इतर धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने जिल्हयातील वैनगंगा, गोदावरी व इतर उपनद्यांना पूर आला. अतिवृष्टी व पुरामुळे हजारो हेक्टर मधील धान पिक सडून गेले. तसेच कापूस, सोयाबीन, भाजीपाला व अन्य पिकाचे सुध्दा मोठे नुकसान झाले आहे. धानाची रोवणी करण्याच्या पुर्वीच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून शेतकरी संकटात सापडला आहे.शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. परंतू बियाणे खरेदी करण्यासाठी गरीब शेतकऱ्यांकडे पैसा नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले असून वर्षभर कुटुंबाचा गाडा कसा चालवावा या विवंचनेत सापडले आहे. अनेक शेतकऱ्यांनी पिक कर्जाची उचल करून खरीप हंगामातील पिकाची लागवड केली. परंतू हंगामाच्या पुर्वीच अतिवृष्टीने पिके हातून गेल्याने मोठी बिकट स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हयातील पिकाची विदारक स्थिती लक्षात घेता गडचिरोली जिल्हयात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी आणि दुष्काळी परिस्थतीत देण्यात येणाऱ्या सोईसवलती आणि योजनांचा लाभ देऊन नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना आधार द्यावा,अशी मागणी केली गडचिरोली जिल्हयातील पिकाच्या झालेल्या नुकसानीबाबत तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. शेतकऱ्यांची झालेली हाणी लक्षात घेता नैसर्गिक आपत्तीच्या मदतीचे निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने अधिवेशन बोलावून ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली जाईल,असे आश्वासन विरोधीपक्षनेते मा.अजीत पवार साहेब यांनी शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांना दिले