अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून गोवंशाची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू असून आता या बहाद्दरांनी अनोखी शक्कल वापरण्यास सुरुवात केली असली तरी रामदासपेठ पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार यांच्या नजरेतून गोवंश तस्कर सुटले नाहीत. अशाच अवैध कत्तली करता नेल्या जात असलेल्या १२ गोवंशाना रामदास पेठ पोलिसांनी जीवदान दिले. ही कारवाई आज पहाटेच्या दरम्यान सुभाष चौक येथे करण्यात आली.अकोला शहरात गोवंश तस्करी करून त्यांची कत्तल करण्याचे हब असलेल्या रामदास पेठ हद्दीतील परिसरात पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांनी डोळ्यात तेल घालून आपला पहारा वाढवला आहे पोलिसांची जरी सतत गस्त चालू असली तरीही तस्कर या ना त्या मार्गाने गोवंश तस्करी करतातच. आज पहाटेच्या सुमारास ताजना पेठ परिसरातील मच्छी मार्केट जवळ ऐक इसम गोवंश घेऊन येत असल्याची माहिती रामदासपेठ पोलिस निरीक्षक किशोर शेळके यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, सदर ठिकाणी पाहणी केली असता कारवाईची भनक लागताच तस्करांनी गाडी सोडून पोबारा केला. गाडीची तपासणी केली असता वाहनात १२ गोवंश निर्दयीपणे कोंबले असल्याचे दिसून आले. रामदास पेठ पोलिसांनी सदर ठिकाणा वरून कत्तली करीता ठेवण्यात आलेले १ लाख ६० हजाराचे १२ जिवंत गोवंश व एक चारचाकी वाहन असा एकूण ६ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी फरार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सदर आरोपीचा कसून शोध घेत आहेत. पकडण्यात आलेल्या गोवंशाना आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्प यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस उपाधीक्षक मोनिका राऊत, रामदास पेठ पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक किशोर शेळके यांच्या मार्गदर्शखाली डी बी कर्मचारी विजय सावदेकर, तोहीद अली काजी, संजय अकोटकर, शिवम दुबे, रवी नागे, मनोज बाहाळ, रमेश बेलखंडे ,चालक दिनकर चौधरी यांनी केली.
गोवंशाची तस्करीत रामदास पेठ पोलिसांनी १२ गोवंशाना दिले जीवदान आरोपी फरार तर ६ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त
![](https://storage.googleapis.com/nerity.com/uploads/photos/2022/08/nerity_75c99fdcf035e43208f5f24acc3c169a.jpg)
![Like](https://storage.googleapis.com/nerity.com/uploads/reactions/like.png)