पाथरी (वार्ताहर) प्रत्येक मनुष्य हा सुख, शांती मिळण्यासाठी सातत्याने धडपड करीत असतो.सांप्रदायिक विचारातून आध्यात्मिक वृत्ती वृध्दिंगत होत असते.खरेतर या उर्जेतून सुखी जिवनाची अनुभूती मनुष्याला मिळते असे आशिर्वचन पर बोलतांना ह.भ.प. महामंडलेश्वर १००८ स्वामी मणिषानंद महाराज यांनी सांगितले.
पाथरी तालुक्यातील हादगाव बु येथे २९ आँगष्ट रोजी नखाते परिवारातील सदस्यांच्या सहभागातून विठोबा महाराज मंदीर जिर्णोध्दार निमित्त ह.भ.प.स्वामी मनिषानंद महाराज पुरी यांचे हस्ते विठ्ठल रुक्मीणी मुर्ती प्राण प्रतिष्ठा व कलश रोहन करण्यात आले यावेळी किर्तनात आशिर्वचन पर ते बोलत होते.
प्रारंभी ह.भ.प. महामंडलेश्वर १००८ स्वामी मणिषानंद महाराज पुरी रूढी यांच्या शुभहस्ते विठोबा मंदिरात विठ्ठल रुख्मीणी मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलश रोहण करण्यात आले.दोन दिवस या कलशाचे धार्मिक विधीवत पुजन शिवराज नखाते आणि सौ.राजकन्या नखाते या दाम्पत्याचे हस्ते केले होते.याप्रसंगी पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते व राकाँ महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते यांनी मनिषानंद महाराज यांचे यथोचित स्वागत केले. उभारीला हाथ जगी,जानवीली मात.देव बैसीले सिंहासनी या जगत् गुरू तुकोबाराय यांचे अभंगावर निरूपन करतांना मनिषानंद महाराज म्हणाले की,नित्याने मंदिरात येऊन भगवंताचे दर्शन घेतले की मन प्रसन्न होत असते.आध्यात्मिक विचारातून सुख मिळत असते.कै.सुखदेवराव नखाते, माजी मंत्री कै.स.गो.नखाते, कै.तुकारामजी नखाते यांचे प्रेरणेतून उभारलेल्या विठोबा महाराज मंदिराचा नखाते परिवाराने अवघ्या दिड महिन्यात जिर्णोध्दार पुर्ण केला.सकाळी दिंडी सोहळ्यात गावातील महिला व पुरूष ,युवकांची उपस्थिती हे एकोपा आसल्याचे दर्शन बघुन मी समाधानी झालो असे त्यांनी सांगितले.यावेळी ह.भ.प.अशोक महाराज, ह.भ.प.डिगांबर महाराज ,सौ.मिनाताई सुरेशराव वरपुडकर यांची विशेष उपस्थिती होती.
या सोहळ्यासाठी रामप्रसाद नखाते,भाऊसाहेब नखाते, शिवाजी नखाते, चंद्रशेखर नखाते, अनिलराव नखाते, संजय नखाते,पराग नखाते ,पंकज नखाते, शिवराज नखाते, युवराज नखाते, राहुल नखाते यांचा विशेष पुढाकार होता तर यावेळी हादगांव बु येथील महिला ,अबाल ,वृध्द, पुरूष मंडळी सह युवक सहभागी झाले होते.यावेळी महाप्रसाद देण्यात आला.