अध्यक्षपदी शेख, कार्याध्यक्षपदी पवार तर सचिवपदी शेलार यांची निवड
पाटोदा (प्रतिनिधी) अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर यांच्या आदेशानुसार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मिडिया परिषदेच्या पाटोदा तालुका अध्यक्ष पदी जावेद शेख, कार्याध्यक्ष पदी बबन पवार यांची तर सचिव पदी हरिदास शेलार यांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की,अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर यांच्या आदेशानुसार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मिडिया परिषदेच्या पाटोदा तालुका कार्यकारिणी निवडी संदर्भात मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल वाघमारे यांच्या सुचनेनुसार डिजिटल मिडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र सिरसाठ यांनी नुकतीच पाटोदा या ठिकाणी एक बैठक घेतली.या बैठकीत त्यांनी परिषदेचे ध्येय,धोरणे, डिजिटल मिडियाचे कार्य काय असणार, ज्यांच्या निवडी केल्या जातील त्यांच्या जबाबदारी काय असणार याची सांगोपांग माहिती देत त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी सर्व सुचनांचे पालन करणे बंधनकारक करुन डिजिटल मिडिया परिषद पाटोदा तालुका अध्यक्ष पदासाठी जावेद शेख,कार्याध्यक्ष पदी बबन पवार तर सचिव पदी हरिदास शेलार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. व त्यांच्या बिनविरोध निवडी जाहीर करण्यात आल्या.नवनिर्वाचित अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि सचिव यांच्या बिनविरोध निवडी झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.