परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
मंगळवार दि.न 30 ऑगस्ट 2022 रोजी संभाजी ब्रिगेडची बीड जिल्हा आढावा बैठक संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक तथा बीड जिल्हा संपर्कप्रमुख शिवश्री प्रा डॉ सुदर्शन तारक सर यांच्या अध्यक्षतेखाली व संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक तथा धाराशिव संपर्कप्रमुख शिवश्री शशिकांत कन्हेरे सर, मराठवाडा विभागीय अध्यक्ष शिवश्री ॲड राहुल भैया वायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीमध्ये बीड जिल्हा कार्याध्यक्षपदी सर्वांनुमाते शिवश्री सेवकराम जाधव सर यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्रा मध्ये नव्यानेच संभाजी ब्रिगेड व शिवसेनेची युती झाली असून या अनुषंगाने महाराष्ट्रभर संभाजी ब्रिगेडच्या बैठका व दौरे सुरू आहेत. त्याच अनुषंगाने आज बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे संभाजी ब्रिगेड ची बीड जिल्हा आढावा बैठक संपन्न झाली. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री मनोज दादा आखरे, संभाजी ब्रिगेडचे महासचिव शिवश्री सौरभ दादा खेडेकर यांच्या सूचनेनुसार संभाजी ब्रिगेड शिवसेना युतीच्या संयुक्त बैठका महाराष्ट्रभर सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून संभाजी ब्रिगेड बीड जिल्हा संपर्कप्रमुख शिवश्री प्रा डॉ सुदर्शन तारक सर, प्रदेश संघटक शिवश्री शशिकांत कन्हेरे सर, मराठवाडा विभागीय अध्यक्ष शिवश्री राहुल भैया वाईकर यांच्या सूचनेनुसार व संभाजी ब्रिगेड बीड जिल्हा अध्यक्ष शिवश्री प्रवीण ठोंबरे सर यांच्या नेतृत्वाखाली आज संभाजी ब्रिगेडच्या बीड जिल्हा कार्याध्यक्षपदी शिवश्री सेवकराम जाधव सर यांची निवड झाली असून या पदाला न्याय देतानाच संभाजी ब्रिगेड शिवसेना युवतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था पूर्ण ताकतीने लढू व संभाजी ब्रिगेडचे कार्य घर तिथे कार्यकर्ता, गाव तेथे शाखा या उक्तीप्रमाणे काम करण्याचं आश्वासन याप्रसंगी निवड झाल्यानंतर सेवकराम जाधव सर यांनी दिले. या निवडी प्रसंगी उपस्थित संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा मध्य विभाग अध्यक्ष शिवश्री विजय दराडे, संभाजी ब्रिगेड बीड जिल्हा अध्यक्ष पश्चिम विभाग शिवश्री प्रा महेंद्र मोरे सर, संभाजी ब्रिगेड परळी तालुका अध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज, संभाजी ब्रिगेड अंबाजोगाई तालुकाध्यक्ष शिवश्री संभाजीराव घोरपडे, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष शिवश्री कैलास चाळक यांच्यासह बीड जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्ह्याचे पदाधिकारी, शहराचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.