पाथरी:- शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना गणवेश आणि पुस्तके मोफत दिली जातात मात्र गणवेश वाटपात केवळ मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ही योजना राबवली जाते त्या मुळे इतर विद्यार्थ्यांची भावना वेगळी निर्माण होत असते. अशा वेळी भेदाभेद होऊ नये हा उद्देश समोर ठेवत तालुक्यातील हादगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळावा यासाठी शिवशक्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुमती अंकुश नखाते यांनी गावच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विस हजारांची आर्थिक मदत दिली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अंकुश चव्हाण यांच्या कडे १००८ महामंडलेश्वर मनीष चैतन्य महाराज यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. यावेळी अंकुश नखाते, उद्धवराव नखाते माजी सरपंच रमेश नखाते, राजेभाऊ नखाते, विलास सत्वधर, आदी मान्यवर उपस्थित होते. आपण समाजाचे काही देणंं लागतो या गावची सून म्हणून आपली काही जबाबदारी आहे. या हेतूने ही आर्थिक मदत देण्यात आल्याचे सौ सुमती अंकूश नखाते यांनी या वेळी सांगितले. प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळावा आणि सर्व विद्यार्थी एकाच गणवेश्या मध्ये दिसावे हा या मागचा हेतू असल्याचे ही त्या या वेळी म्हणाल्या. विद्यार्थ्यांच्या गणवेशा साठी सौ सुमती नखाते यांनी केलेल्या मदती बद्दल शाळेच्या वतीने मुख्याध्यापक चव्हाण यांनी आभार व्यक्त केले.