पाटोदा (प्रतिनिधी) देशासह संपूर्ण महाराष्ट्र कोरोना सारख्या महाभयकर आजाराने भयभीत झाले असून आताशी कुठे तरी सर्व सुरळीत चालू झाले असताना पाटोदा तालुक्यात घाणीचे साम्राज्य वाढले असल्यामुळे पाटोदा तालुक्यात ढासाचा सुळसुळाट वाढला असल्यामुळे डेंगू,मलेरिया व इतर साथीच्या रोगाचा प्रकोप वाढलेला असून, गेल्या काही दिवसांत तालुक्यातील रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे त्यामुळे डासांचा उपद्रव असलेल्या पाटोदा तालुक्यात विविध भागात तात्काळ फॉगिंग मशीन द्वारे औषध फवारणी करण्यात यावी आशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या महिला तालुकाध्यक्ष निलाताई पोकळे यांनी केली आहे तालुक्यात रोगराई पसरत असताना आरोग्य विभागाने फॉगिंग मशीन पुजायला ठेवल्यात का शहरात ढासाचे साम्राज्य वाढले आहे सध्या पाटोदा तालुक्यात डेंगू चिकन गुणीया आजाराने थैमान घातले असून डेंगीचा प्रसार करणाऱ्या डासांची संख्याही वाढली आहे. डेंगीवरील नियंत्रणासाठी पाटोदा आरोग्य विभागाने तात्काळ उपाय योजना राबविल्या पाहिजे परंतु गंभीर विषयाकडे प्रशासन लक्ष द्यायला कोणीही तयार नसल्याने सामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे यामुळे पाटोदा तालुक्यात आरोग्य विभागाने औषधी फवारणीची करण्याची गरज असुन अधिकारी वर्गानी बैठक घेऊन डास असलेला भाग निश्‍चित करून औषध फवारणी करण्यासाठी दिवस ठरवुन देण्यात यावा यामुळे ढासाने परेशान झालेली सामान्य जनता सुटकेचा श्वास घेता येईल यामुळे लवकरात लवकर आरोग्य विभागाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या महिला तालुकाध्यक्ष निलाताई पोकळे यांनी केली आहे