शिरुर:- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांना योजनेचा पुढील लाभ चालू राहण्यासाठी केंद्र सरकारने e kyc बंधनकारक केलेले असून लाभार्थीच्या ई केवायसी चे काम १०० टक्के पुर्ण करण्यासाठी शिरूर तालुक्यात ३१ ऑगस्ट पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या कामी प्रत्येक गावात ज्या लाभार्थ्यांचे ekyc बाकी आहे अशा शेतकऱ्यांच्या याद्या विविध माध्यमातून प्रसिद्ध केल्या असुन कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक गावपातळीवरील काम करत आहे. सर्व लाभार्थ्यांनी ekyc 31 ऑगस्ट 2022 पूर्वी पूर्ण करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी केले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या लाभार्थीच्या ई केवायसी चे काम पुर्ण होण्याकामी हाती घेण्यात आलेल्या विशेष मोहीम अंतर्गत दि २७ व २८ रोजी याद्याला प्रत्येक गावात प्रसिद्धी देण्यात आली आहे व दि २९,३०,३१ रोजी विशेष ekyc कॅम्प आयोजित करण्यात येत आहे. लाभार्थी स्वतः ekyc करू शकतात किंवा आपल्या जवळच्या csc केंद्रात जाऊन e kyc करू शकतात. ज्या लाभार्थ्यांच्या आधार कार्ड ला मोबाइल नंबर लिंक आहेत त्यांना मोबाइल वर ई केवायसी करता येईल व ज्यांचा मोबाइल नंबर आधार कार्ड शी लिंक नसेल अशा लाभार्थीने सी एस सी सेंटरवर जाऊन ई केवायसी करता येईल असे ही सिध्देश ढवळे यांनी सांगितले आहे.
तसेच ई केवायसी चे काम १०० टक्के पुर्ण करून आपल्या गावातील एकही शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी गावचे पदाधिकारी यांनी ही मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करण्याची विनंती केली आहे . शेतकऱ्यांना ई केवायसी करताना काही अडचण आल्यास आपल्या गावच्या कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा.