दोन दिवसांनी गणेशोत्सवाला प्रारंभ होत असुन यंदा मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याने या कालावधीत शहरातील बाजारपेठेत खुप गर्दी होऊ शकते ही गर्दी होऊ नये या अंमलबजावणीला सुरुवात करुन पी१ व पी२ चा शुभारंभ करण्यात आला आहे.
यावेळी प्रशासक तथा मुख्याधिकारी-पंकज भुसे, पोलिस निरीक्षक-नितिन गवारे, व्यापारी बॅंकेचे चेअरमन -संदिप पाटील, नगरपरिषद कार्यालयीन प्रशासिक अधिकारी-परेश कुंभार, प्रशांत दिवेकर, राकेश पाटील, सतेज निमकर, सतिष जंजिरकर,सुदेश माळी, पोलिस नाईक -सागर रसाळ,नदुकिशोर आंबेतकर संजय वेटकोळी,रुपेश पाटील,बाबु सुर्वे,राशीद फहीम,माजी शिक्षक- दामाद आदिंसह नागरिक व व्यापारी वर्ग उपस्थित होते.
शहरात ११ दिवस गणेशोत्सवात खरेदीकरिता नागरिकांची खुप गर्दी होत असल्याने बाजारपेठेत वाहतूक कोंडी होत असते त्याचा नागरिकांना खुप त्रास होतो यावरील उपाय योजनेबाबत मुरूड चे प्रशासक तथा मुख्याधिकारी-पंकज भुसे यांनी व्यापारी वर्ग , पोलिस प्रशासन यांच्या बरोबर बैठक घेऊन बाजारपेठेत वाहतूक कोंडी बाबत चर्चा करून त्या संदर्भात नियमावली करण्यात आली त्यां नियमिचे पालन वाहन चालकांने करावे असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी-पंकज भुसे यांनी आज मुख्य बाजारपेठेत येऊन यावेळी केले.त्यावेळी पी१ व पी२ दिशा फलक लावण्यात आले यामध्ये पी१ विषम तारखेनुसार गाड्या एकाबाजूला उभा करायच्या तर पी२ यामध्ये सम तारखेनुसार गाड्या उभ्या कराव्यात.
त्याबरोबर एक दिक्षा मार्गचा वापर करावा, कल्याणी हाॅस्पीटल ते पुरकर नाका व पुरक नाका ते १ नंबर शाळा हा मार्ग असणार आहे., चारचाकी वाहन यांच्या करिता पार्किंग नगरपरिषद समोरील सिध्दी बाग व कुलाबा बाजार येथे गाडी पार्किंगसाठी सोय करण्यात आली आहे.त्याठिकाणी पार्किंग करुन सहकार्य करावे व वाहतूक नियमांचे पालन करावे जो नियमांचे पालन करणार नाही त्या वाहन चालक-मालकावर दंडात्मक कारवाई पोलिस मार्फेत करण्यात येईल.तरी वाहनं चालकांसह नागरिकांनी ही सहकार्य करावे असे आवाहन मुरुड नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी-पंकज भुसे यांनी केले.