औरंगाबाद :- दि.२९ (दीपक परेराव)औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा अतिरिक्त आयुक्त यांना गणेश चतुर्थीच्या आगमना निमित्त औरंगाबाद शहरातील सर्व रस्त्यातले खड्डे बुजविण्यात यावे तसेच इतर समस्या सोबत निवेदन देण्यात आले. पावसामुळे औरंगाबाद शहरातील प्रत्येक रस्त्यात मोठ-मोठे खड्डे झाले असुन येत्या दोन दिवसात गणेश चतुर्थी निमित्त गणरायाचे
आगमन होत आहे, यासाठी भाविकांना गणरायाचे स्थापना करत असताना यावेळी रस्त्यात पड़लेल्या खड्यांमुळे जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.करीता लवकरात लवकर औरंगाबाद शहरात असलेल्या रस्त्यां मधील खड्डे हे मुरुम टाकुन बुजविण्यात यावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी औरंगाबाद तर्फे रस्त्यातील खड्यामध्ये बेशरमांची रोप लावुन मनपाचा निषेध करण्यात येईल.असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून सांगण्यात आले.
मनपा अतिरिक्त आयुक्त नेमाने यांना निवेदन सादर केले या निवेदनामध्ये गणरायाच्या स्थापनेच्या वेळी मूर्ती घेऊन येत असताना जर खड्ड्यामुळे अपघात घडला आणि मूर्तीची विटंबना झाली तर त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न अतिरिक्त आयुक्तांना विचारल्यावर त्यांनी असा कोणताही प्रकार घडणार नाही खड्डे त्वरित मनपाच्या वतीने बुजविण्यात येतील असे आश्वासन दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला, कोषाध्यक्ष अय्युब खान, औरंगाबाद राष्ट्रवादी शहर जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद हबीब मुन्ना भाई, पुर्व विधानसभा कार्याध्यक्ष जावेद नवाज खान,युवा शहर अध्यक्ष मयुर सोनवणे, युवा शहर कार्याध्यक्ष शेख कय्यूम, माजी नगरसेवक मोतीलाल जगताप, अनिल विधाते माजी नगरसेवक, माजी नगरसेवक अश्फाक कुरैशी,शहर उपाध्यक्ष अशोक बंसवाल, शेख कलीम पुर्व विधानसभा सचिव,फेरोज खान पुर्व विधानसभा सहसचिव,साजीद शेख,असदउल्ला तर्रार आदींची प्रमुख उपस्थिती होती.