यवतमाळ : मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त क्रिडा अधिकारी कार्यालय व हॉकी असोसिएशन यांच्या तर्फे पोलिस व पत्रकांराचा सत्कार करण्यात आला. साई सत्यज्योत मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला पोलिस निरीक्षक मनोज केदारे,सामाजिक कार्यकर्ते भाई अमन, मनिषा आखरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला पत्रकार, पोलिस कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू उपस्थित होते.
मेजर ध्यानचंद जयंतीनिमित्त पत्रकार, पोलिसांचा साई सत्यज्योत मंगल कार्यालय येथे सत्कार : जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाचा कार्यक्रमासाठी पुढाकार
