फुलंब्री तालुक्यातील अनेक गावांमध्ये महावितरण कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थांना नाहक याचा त्रास सहन करावा लागत आहे.

असाच एक प्रकार समोर आला असून फुलंब्री तालुक्यातील उमरावती येथील ग्रामपंचायत कार्यलयाची पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीला कनसेक्शन देणारा ट्रान्सफर्मर मागील काही महिन्यांपूर्वी जळाला होता,त्याला दुरुस्त करण्याची मागणी ग्रामपंचायत व सदरील ट्रान्सफरामवरवर असलेले शेतकरी करीत होते मात्र सदरील ट्रान्सफरव रील शेतकऱ्यांनी व ग्रामपंचायतीने वीज बिल भरावा नंतर जळलेला ट्रान्सफर्मर बदलून मिळेल असे सांगितले,यावरून 10 शेतकऱ्यांनी प्रत्येकी 5 हजार रुपये भरणा करून महावितरण कडून नवीन ट्रान्सफर्मर मिळवला,परंतु महिन्या भराच्या आतच तो पुन्हा जळाला,असता त्याला पुन्हा दुरुस्त करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली मात्र,महावितरण कंपनीने त्यांना टाळा टाळ केली यानंतर 16 जून रोजी जळलेला ट्रान्सफर्मर महावितरण कोणीने काढून नेला तो आज पर्यत दिलाच नाही यामुळे शेतकऱ्यांन सह ग्रामस्थावर भर पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे,ग्रामपंचायत कार्यालया मार्फत महावितरण कार्यालय आळंद येथे निवेदन देण्यात आले असून लवकरात लवकर नवीन ट्रान्सफर्मर मिळावा अशी विनंती करण्यात आली आहे,आता हा शेतकऱ्यांचा व ग्रामस्थांच्या पाणी टंचाई प्रश्न महावितरण कर्मचारी मार्गी लावतील का याकडे सर्वांचे लक्ष लागगुण आहे